कोंढवा खुर्द शिवनेरी नगरच्या कांही भागात पावसामुळे झालेला राडारोडा आणि वाहून आलेला कचरा यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. व पावसामुळे रस्त्यावर अनेकठिकाणी खड्डे पडले आहेत. आशा तक्रारीमुळे नगरसेवक हाजी अब्दुल गफूर पठाण यांनी प्रभागाची पाहणी करून परिसराचा आढावा घेतला.
शिवनेरीनगर भागातील सर्व लेनमध्ये त्यांनी स्वतः जाऊन स्वतःच्या मोबाईल मध्ये रस्त्यावरील खड्ड्याचे फोटो काढून घेतले. काम करण्याचे आश्वासन देत,"आता एकदा फोटो घेतलं म्हणटल्यावर डायरेक्ट दुरुस्तीचेच फोटो आपल्या पाहायला मिळतील असे सांगितले.
व लगेचच संबंधित कचरा अधिकारी, मुकादम यांना बोलावून रेंगाळलेली काम करुन घेण्याच्या सूचना दिल्या.