लातुरात एका सुसक्षित ओ.बी.सी कुंटुंबाने घेतली बुद्ध धम्माची दिक्षा.

लातूर:लातुरात एका सुसक्षित ओ.बी.सी कुंटुंबातील आई व दोन मुलांनी घेतली बुद्ध धम्माची दिक्षा.


महाराणा प्रताप नगर,मळवटी रोड लातुर येथील रहिवाशी असलेल्या कुटुंबातील आकाश व्यंकट कांबळे त्यांची मातोश्री अंबिका कांबळे व बंधु सुमीत कांबळे या तिघांनी जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्ध धम्म तत्वज्ञानाचा मार्ग अनुसरला आहे.

दि.१२ सप्टेंबर २०२० रोजी नालंदा बुध्द विहार,प्रकाश नगर लातुर येथे भिक्खु पञ्ञानंद यांच्या हस्ते त्यांच्या कडून त्यांनी जाहीर रीत्या धम्मची दीक्षा घेतली.


तथागत गौतम बुध्द,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पूष्प,धुप,प्रदिपाने पूजा करुन त्रिशरण पंचशिल आणि २२ प्रतिज्ञा म्हणत बौध्द धम्म दिक्षा घेतली.

बुद्ध धम्माची दिक्षा घेतलेले आकाश व्यंकट कांबळे हे बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले असुन त्यांचा फोटोग्राफी व्यवसाय आहे.तर त्याच्या भाऊ दहावीचे शिक्षण घेत आहे. हे दोघेही बंधु तरुण आणि शिक्षित आहेत. दोन भाऊ आणि आई आशा तिघांनी बुद्धधम्म स्वीकारला आहे.

कुठल्याही भिती पोटी वा दबावाखाली न येता सद् विवेक बुध्दीने आम्ही बुद्धधम्म स्विकारत असल्याचे सांगितले. हे कुटुंब हिंदु-कलाल ( OBC) या category मधील आहेत.

यावेळी डॉ.अरुण कांबळे ,जोगदंड, भिक्खु पञ्ञानंद लातुर उपस्थीत होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने