आमदार सुनीलभाऊ कांबळे यांच्याकडून कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या विविध साहित्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांचा चेक पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघातील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयास प्रदान



पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघातील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयास कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या विविध साहित्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांचा चेक आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी आज कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सी.ई.ओ. अमित कुमार साहेब यांच्याकडे सुपूर्त केला.

यावेळी सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयाचे आर. एम. ओ. डॉ. विद्याधर गायकवाड, बोर्डाचे उपाध्यक्ष श्री.विवेक यादव नगरसेविका प्रियांका श्रीगिरी, किरण मंत्री व नगरसेवक दिलीप गिरमकर,अतुल गायकवाड तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.




Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने