आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक घेऊन कोरोना संदर्भात माहिती जाणुन घेतली व प्रशासनाकडून मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श़्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी दि.१७ सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक घेऊन
कोरोनासंदर्भात चर्चा केली. व डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या.


यावेळी त्यांनी त्याचबरोबर झालेल्या बैठकीत त्यांना जी काही मदत लागेल त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून सध्या कमतरता भासत असलेल्या रेमडिसिव्हिर औषध उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांचे कोरोनायोद्धा म्हणून गौरव करत त्यांचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने