उत्तरप्रदेश येथील हाथरस मधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत जात असताना काँग्रेसचे नेते मा. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली.त्यावेळी ते खाली पडले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले याचे पडसाद पुण्यात उमटले.
पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष मा. श्री रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज (एक अगष्ठ) सायं. ४.०० वाजता बालगंधर्व चौक, पुणे येथे निषेध आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी यूपी व भाजप सरकारच्या प्रतिकृतीला जोडे मारून पोषटर्स जाळून घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री,नगरसेवक बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. २/१०/२०२० रोजी सकाळी ९ वा., कै. आण्णासाहेब मगर पुतळा, गुलटेकडी मार्केटयार्ड येथे कामगार विरोधी केलेले काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी मा. मुख्यमंत्री आ. पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करणार आहे.