पुणे:भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
१९०९ ते १९४८ असे ४० वर्षे शिक्षण क्षेत्रात शिक्षक, प्राध्यापक विद्यापीठ कुलपती कुलगुरू म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले असुुन ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्मदिन हाा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्याने आज शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी विविध ठिकठिकाणी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे सर्व शिक्षक बंधू भगिनींना हार्दिक सुभेच्छा!
नवे पर्व-
ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नवे शोध नवे आव्हाने समोर येत आहेत. मोबाईल दूरदर्शन,इंटरनेटच्या एक क्लिकवर जग समोर आलेले आहे. घरात बसून इतर देशांतील कंपन्या साठी काम करता येणे शक्य झालेले आहे.कांही तासात जगात कोठेही जात येते. अगणित ज्ञानाच्या दिशा आणि व्याप विस्तातलेला आहे.
त्यामुळे नव नवे ज्ञान आत्मसात करून घेणारे ज्ञान संपन्न शिक्षकच समाजाला न्याय देऊ शकतात. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. आणि भक्कम राष्ट्र निर्माण करू शकतात.
शिक्षकांची चूक म्हणजे एक पिढी वाया-
"माळ्याच्या हातून चूक झाली तर एक उद्यान बाग वाया जाऊ शकते. एखादया अभियंत्याने चूक केली तर एक इमारत कोसळु शकते. एखाद्या डॉकटरच्या हातून चुक झाली तर तो रुग्ण दगवू शकतो परंतु एखाद्या शिक्षकाच्या हातून चूक झाली किंवा चूकीचे ज्ञान, शिक्षण,मार्गदर्शन झाले तर एक नव्हे तर संपूर्ण पीढी समाज वाया जाऊ शकतो. म्हणून तर इतरांपेक्षा शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून समाज आणि देश घडत असतो. म्हणून शिक्षकाला समाजात अनन्य साधारण असे महत्व आहे.
वैदिक संस्कृतीत गुरुचे महत्व-
वैदिक संस्कृतीत शिक्षकाला गुरुला देवाच्या स्थानी मानले गेले आहे.जो देतो तो देव.गुरुंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे अशी अपेक्षा गुरु कडून असते. जे जे आपणासि ठावे,ते दुसर्यांना सांगावे.