पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची शक्यता लक्ष्यात घेऊन यावेळी शासकीय मार्गदर्शक तत्वानुसार साधेपणाने गणेशोत्सव सण साजरा झाला. त्यामुळे गणेशोत्सववात ना ढोलचा आवाज घुमला, ना ताशाचा कडकडाट ऐकायला मिळाला.
प्रभाग क्र. 41 च्या कार्यक्षम नगरसेविका सौ. संगीताताई ठोसर यांनी महानगर पालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जनासाठी व्हॅनवरच्या हौदाची सोय केली होती. त्यामुळे नागरिकांनी घरासमोरच त्या हौदात गणेशाचे विसर्जन केले.
प्रत्येक वर्षाला गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होतो. विविध देखावे असतात.पाहण्यासाठी व दर्शनासाठी विविध भागातून आणि देश विदेशातील पर्यटक पुणे शहरात येत असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेश मंडळांना बंधन आणि निर्बंधाचे मार्गदर्शक तत्व लागू होती. त्यामुळे विद्युत रोषणाई, सिनेतारकांची उपस्थिती, ढोल ताशाचा कडकडाट, मांडव सजावट, डेकोरेशन आदी उपक्रम राबवता आले नाहीत.
गणेश मूर्ती विसर्जनासाठी नगरसेवकांनी महापालिकेच्या माध्यनातून फिरत्या वाहनात हौदाची सोय केली होती.