भीम छावा संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष शाम भाऊ गायकवाड यांच्या नेत्रत्वात विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.
प्रशासनाच्या हलगर्जीपनामुळेच पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून यांच्या कुटुंबियातील एकाला नोकरी द्यावी.व मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा.
कोविड सेंटर मध्ये पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवा.प्रत्येक कोविड सेंटर मध्ये सिसिटीव्ही बसवा अशा मागण्याचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
दलित कोब्रा संघटनेचे भाई विवेक चव्हाण उपस्थित राहून पाठिंबा दिला व दोषींवर कारवाईची मागणी केली.
यावेळी निलेश गायकवाड, विशाल कांबळे, आमित मोरे, अनिकेत साखर, ज्ञानेश्वर गायकवाड, यल्लपा गायकवाड, धम्मपाल कांबळे, नेहाला गाडे, सुजित टेकाळे, अक्षय धेंडे, नितीन अहिरे, चंद्रकात सोनकांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.