पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भल्या पहाटे 6 वाजताच पुणे मेट्रो ची पाहणी



पुणे दि.२५: पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून (२५ सप्टेंबर) पहाटे 6 वाजताच पुणे मेट्रो ची पाहणी करून कामाचा आढावाा घेतला. व पहिले तिकीट काडून संत तुकाराम नगर ते पिंपरी असा अधिकाऱ्या समवेत प्रवास केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता मेट्रोच्या कामाची पाहणी केली. पुणे आणि जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा जाणून घेतला. यावेळी त्या त्या विभागांना कामा संदर्भात कांही सूचना ही केल्या.
पाहणी दौरा झाल्या नंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.


यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस, सैन्य दल तसेच सबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी पुरविला जाईल, तथापि दोन्ही महानगरपालिका व महसूल विभागाने भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच या परिसरातील सुशोभिकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या परवानग्या महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिळवून द्याव्यात. चांदणी चौकाची सुधारणा करण्याच्या कामात अडचण येऊ नये यासाठी सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या.

नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगून यामार्गावरील मेट्रोचा समावेश करण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने भूसंपादनासह अन्य कामे जलद गतीने पूर्ण करावीत,असे ही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस यांनी कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post