कृषी,सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेष्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी सोशल मिडियावर माहिती शेअर करून केली आहे



पुणे:महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री आणि पलूस कडेगाव मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ.विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यांच्यात ताप व अंगदुखीची सौम्य लक्षणे जानवल्याने त्यांनी स्वतःची कोरोनाची टेष्ट करून घेतली असता त्यांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहे.

सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती शेअर केली असून त्यांनी त्यात म्हंटले आहे की, धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतो.

तरी परंतु काल थोडा ताप आणि अंगदुखी,अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने चाचणी करून घेतली असता अहवाल पोजिटिव्ह आलेला आहे.

त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी. असे आवाहन त्यांनी संपर्कात अलेल्या कार्यकत्याना केले आहे.

ते वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. लवकरच संसर्गातून बरा होवुन सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने