पुणे:पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद विद्यानाथ पोतदार वय (५१) यांचा कोरोनाविषाणू विरुद्ध लढताना दुःखद निधन झाले आहे.
कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षितते साठी सम्पूर्ण पोलिस यंत्रणा जिवाची पर्वा न करता कार्यरत आहेत.
कोरोनाच्या या युद्धजन्य परिस्थितीत लढताना कांही पोलीस कर्मचारी सुद्धा कोरोना बाधित झाले. तर त्यात काहींना जिव ही गमवावा लागला.
वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद विद्यानाथ पोतदार वय (५१) यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असता कोरोना विषाणू विरुद्ध लढताना त्यांचे दिि.१७ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या आत्म्यास शांती प्राप्त होवो अशी कामना पुणे पोलीस दल यांच्या वतीने करण्यात आली आहे. आणि आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असतील आशा भावना व्यक्त केल्या आहेत.