पुण्यातील कोंढवा खुर्द येथे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत मास्क व सँनेटाईझरचे वाटप करण्यात आले

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११


पुणे:कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर मध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नागरिकांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत मास्क व सँनेटाईझरचे वाटप करण्यात आले.

कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क व सेनेटायझर प्रत्येकांनी वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे या साहित्याचे मोफत वाटपाचा कार्यजर्म रविवार दि.२० सप्टेंबर रोजी शिवनेरी भागात घेण्यात आला.




यावेळी पुणे शहर अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री श्री रमेश दादा बागवे यांच्या हस्ते नागरिकांना मास्क व सँनेटाईझर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा महिला अनु.जाती विभाग अध्यक्षा सौ.रिबेका प्रभानंद कांबळे यांनी केले होते.
तर याचे नियोजन हडपसर विधानसभा काँग्रेस सरचिटनीस देवदास लोणकर यांनी केले होते.
यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना रमेश बागवे म्हणाले"
"काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांच्या सोबत असून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. सत्ता असो किंवा नसो, सर्वसामान्यांच्या सोबत काँग्रेसचा हात यापूर्वी होता, आता ही आहे, आणि या पुढे ही राहणार आहे.
कोंढवा खुर्द भागात 3000 मास्क व सँनेटाजरचे वाटप काँग्रेस पक्षाच्या वतीने केले जाणार आहे.असे मा.रमेशदादा बागवे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी हडपसर विधानसभा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.प्रो.शोहेब ईनामदार, उपाध्यक्ष मा.शब्बीर कप्पासी व हडपसर विधानसभा महिला काँग्रेस अध्यक्षा मा.सौ.माया डुरे,पुणे शहर सेवादलाच्या मा.सौ.विना कदम,पुणे शहर महिला सचिव मा.सौ.कांचन बालनायक, हडपसर विधानसभा कामगार संघटना अध्यक्ष मा.श्री गजाणन भोसले, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या मा.ग्लाँडस डायस.हडपसर विधानसभा अपंग सेल उपाध्यक्ष मा.श्री विजय इंगळे तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा महिला अनु.जाती विभाग अध्यक्षा मा.सौ.रिबेका प्रभानंद कांबळे यांनी केले तर नियोजन हडपसर विधानसभा काँग्रेस सरचिटनीस मा.श्री देवदास दत्तात्रेय लोणकर यांनी केले.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने