स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.मोफत मिळणार ३०हजार रु,पर्यंत वैद्यकीय खर्च

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

रस्ते अपघातातील व्यक्तींना वेळीच उपचार मिळल्यास त्याचा जीव वाचविणे शक्य असते. त्यामुळे अपघातग्रस्त नागरिकांना वेळेवर उपचार व्हावेत यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि.१६ सप्टेंबर २०२०) हा निर्णय घेण्यात आला असून अपघातातील व्यक्तींना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे. 
२०१५ च्या अखेरीस युतीच्या काळात या योजनेची घोषणा  शिवसेना नेते तत्कालीन अरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे विमा योजनाची घोषणा केली होती. ती घोषणा आज प्रतक्षात राबविण्यासाठी आजच्या मंत्रिमंडल बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर झालेल्या अपघाता मधील व्यक्तिंना तो कोणत्याही राज्याचा, देशाचा असला तरी याचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयामुळे कोणत्याही राज्यातील व देशातील व्यक्तींना महाराष्ट्रात रस्त्यावर अपघात झाल्यास योग्य ते वैद्यकीय उपचार मिळणे यामुळे शक्य होणार आहे.

सुमारे ७४ प्रकारच्या उपचार संदर्भात (३०,०००) तीस हजार रुपये पर्यंतचा खर्च मोफत केला जाईल.यामध्ये अतिदक्षता विभाग व वार्ड मधील उपचार,अस्थीभांग व भोजनाचा समावेश असणार आहे.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने