पुणे:केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित कांदा हा मागणी अभावी व योग्य दरा अभावी तसाच पडून आहे.
त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांचे मोठे नुकसात होत आहेत.
त्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष मा. रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. १६/९/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
यावेळी आजी, माजी आमदार, नगरसेवक व नेते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.