पुण्यातील प्रभाग क्र १९ मध्ये काँग्रेसचे लोकप्रिय,अभ्यासू नगरसेवक मा.अविनाश बागवे यांच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेची सुरुवात करण्यात आली.

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

पुणे:पुणे महानगरपालिका व प्रभाग क्र १९ चे लोकप्रिय,अभ्यासू नगरसेवक मा.अविनाश रमेशदादा बागवे यांच्या वतीने प्रभाग क्र १९ काशिवाडी या भागात विविध ठिकाणी मोफत कोरोनाची तपासणी करून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू करण्यात आली.

माझा प्रभाग हा माझा परिवार असे समजुन नगरसेवक श्री अविनाश बागवे यांनी कोविंड-१९ या रोगावर नियंत्रणासाठी प्रभागात फिरून प्रयत्न करीत आहेत.
त्यानुसार आज माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहोमीची सुरवात करण्यात आली.

पुणे महानगर पालिकेतील कांही कर्मचारी व त्या भागातील सर्व स्थानिक कार्यक्रर्ते व सामान्य नागरीक यावेळी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकाचे सर्वेक्षण अधिकारी घरोघरी येऊन कोरोना सर्वेक्षण व त्या विषयी माहिती देणारं आहेत. त्यामुळे नागरिकांनी न भिता न घाबरता सर्वेक्षण अधिकारी यांना आपण सहकार्य करावे.अशी विनंती नगरसेवक अविनाश बागवे यांनी यावेळी नागरिकांना केली आहे.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने