उमरगा:उस्मानाबाद जिल्ह्यात दि. २९ ऑगस्ट रोजी १४५ कोरोना रुग्णाची भर पडली आहे.
आज दिनांक २९अगस्ट रोजी प्राप्त अहवालानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात आज ७६ रुग्ण बरे होऊन घरी परतलेत आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत ३४०१ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. आणि जिल्हयात सद्या ५७६१ व्यक्ती कोरंटाईनमध्ये आहेत. तर ९७२ व्यक्ती संस्थात्मक कोरंटाइन आहेत.
उमरगा तालुक्यातील आलूर गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये असे गावभर डांगुरी देण्यात आली आहे.
संपूर्ण देश विदेशात कोरोनाचा शिरकाव झाला परंतु या गावात आत्ता पर्यंत एक ही कोरोनाचा रुग्ण नसल्याने कोरोना वेशीबाहेर ठेवण्यात गावकरी आणि प्रशासनाला आता पर्यंत यश आले होते.
पण आता गावात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे निसचिंत असलेले गावकरी कांही प्रमाणात चिंतीत आहेत.
कामानिमित्त बाहेर गावी इतर शहरात असलेले कांही नागरिक गावात १५दिवस korantan राहून आपल्या घरी निवांत होते.
आज प्रथमच रुग्ण आढळल्याने गावात कांही निरबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे गावात रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.