JEE NEET च्या परीक्षा केंद्र सरकारने आत्ताच घेवु नये, या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंदोलन करण्यात आले

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११
पुणे:परीक्षा घेण्यास आमचा विरोध नाही पण ही सदयाची वेळ योग्य नाही. मंदिर मस्जिद, धार्मिक स्थळं,व सार्वजनिक स्थळं बंद आहेत, मग विद्यार्थ्यांचा जीव का धोक्यात घालता असा प्रश्न उवस्थित करून माजी गृह राज्यमंत्री रमेश दादा बागवे यांनी केंद्र सरकरच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला.

JEE NEET च्या परीक्षा त्वरीत केंद्र सरकारने रद्द कराव्यात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी साठी रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंदोलन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मा.रमेश बागवे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध दर्शवुन विद्यार्थीच्या जीवाला धोका असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

कोरोनाचे संकट आज ही कायम आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाखों विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता असताना आहे. आशा कठीण परिस्थितीत केंद्र शासनाने JEE-NEET च्या परिक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या केंद्र शासनाच्या निर्णयाने पालक व विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता संदर्भात मोठी चिंता निर्माण झाली आहे.

देशभरात या निर्णया संदर्भात सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. ही नाराजी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष अभियान राबवत आहे.

भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या पुढाकाराने व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन केले जात आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post