कोंढवा खुर्द येथील ए एस के हाँल मध्ये इनक्रेडिबल समाजसेवक गृपच्या वतीने दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थीचा सन्मान व त्यांना पुढील
शिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या जीवनात १० व १२ हे महत्वाचे वर्ष असते. त्यामुळे त्यांना १० वी १२ नंतर उपलब्ध विविध शैक्षणिक पर्यायाची माहिती मिळावी आणि ते यशस्वी जीवन जगावे म्हणून कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहात डिस्टनसिंग नुसार बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
व्यासपीठावर उपस्थित इब्राहिम खान इला दलवाई बदामी कपासी राजेंद्र भालेकर, सिकंदर पठाण जान मोहंमद, हबिब शेख, यांच्या शुभ हस्ते यशस्वी विध्यार्थींना संन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर मार्गदर्शनात स्काँलरशिप, आय टि आय प्रवेश, विविध कॉम्प्युटर कोर्स , एन ए टि, सि ए टि,आर्ट कॉमर्स सायन्स आणि विविध उपलब्ध कोर्स याची निवड प्रक्रिया आणि ती कशी करावी याची सविस्तर माहिती त्या त्या विभागाच्या मार्गदर्शकांच्या मार्फत देण्यात आली. शाहिन इन्स्टिट्यूट चे डायरेक्ट मुल्ला साहेब व फारूख भाई यांनी ही यावेळी माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सहहयोगी म्हणून पाथवे फौडेशन, शाईन इन्स्टिट्यूट, ह्युमेनिटि फौ, अहद फौ, (मजहर मणियार) व इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे सर्व पदाधिकारी यांनी नियोजनपूर्वक यशस्वी कार्यक्रम घडवून आनला त्यामुळे संयोजकांनी या कार्यकत्यांचे मनःपूर्वक आभार आणले आहे..