मुंबईतील जिम चालकांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट जिम सुरू करण्या बाबत झाली चर्चा


फोटो.ट्विट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज मुंबईतील जिम चालकांनी भेट घेऊन जिम सुरू करण्याची मागणी केली आहे.

लॉकडॉऊन मुळे इतर व्यवसाया प्रमाणे गेली सहा महिने जिम व्यवसाय ही बंद करावा लागला. त्यामुळे जिम व्यावसायिक भांडवल गुंतवून ही आर्थिक संकटात सापडला. तर दुसरूकडे नियमित जिम करणार्यांची मोठी  गैरसोय निर्माण झाली.
त्यामुळे आता जिम सुरू करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी मुंबई जिम व्यावसायिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे,परंतु जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत.ते जिम मालकांनी सादर करावीत असे संगीतले.

सरकारला मार्गदर्शक तत्व सादर केल्यानंतर त्यावर विचार करून सादर केलेल्या तत्वाच्या आधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे. 

त्यामुळे आता लवकरच जिम सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने