उस्मानाबाद- उमरगा-
उमरगा तालुक्यातील एकूरगा येथील आशिष नामदेव कांबळे व जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड यांनी भारतीय लोकसेवा आयोग-यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.
त्यांची केंद्रिय लोकसेवा आयोगा मार्फत जिल्हाधिकारी म्हणुन त्यांची निवड कटण्यात अली आहे.
त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात उमरगा तालुक्यातील आशिष नामदेव कांबळे आणि निलेश गायकवाड यांनी आय एस आय अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.आशिष कांबळे यांनी याच वर्षी मार्च महिन्यात केंद्रीय वन सेवा अधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवून 66 वा क्रमांकाने ऊत्तीर्ण झाले होते.आता जिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.
निलेश गायकवाड यांचे कौतुकास्पद यश-
बेट जवळगा येथील निलेश गायकवाड यांनी पण युपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे. निलेश यांनी आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनीरिंगमध्ये बी.टेक आणि एम.टेक.शिक्षण आणि गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेड मध्ये इंटर्नशिप केले आहे.
सदया ते बेंगलोर येथे 'झीनोव्ह कंन्सलटन्सी कंपनीमध्ये सहयोगी कंन्सलटन्ट म्हूणन सेवेत आहेत.सेवेत असले तरी त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी परिश्रम घेत यश मिळवले आहे.या दोघांचे ही गाव तालुका आणि जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.
Tags:
Political: