रॅली, तिरंगा ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि क्रांतीकारकांना अभिवादन करून कोंढव्यात क्रांति दिन साजरा

पुणे /कोंढवा प्रतिनिधी -

पुण्यातील कोंढवा खुर्द येथे 9 ऑगष्ट क्रांती दिन निमित्य रविवार दिनांक ९आँगस्ट रोजी शीतल पेट्रोल पपं समोरील मौलाना अबुल कलाम आझाद चौकात इनक्रेडिबल समाजसेवक गृपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी प्रभाग क्र.२७चे नगरसेवक हाजी गफूर पठाण, मजहरशेख, हबिबशेख यांनी यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. त्यानंतर जोती हॉटेल चौक पर्यंत रॅली काढण्यात आली

ज्योती चौकात ध्वजारोहण,राष्ट्र गीत आणि क्रांतिकारकांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..यावेळी युक्रात संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन चकाले, मोहम्मद खान,गणेश भुईटे इजाज शेख इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यानी मनोगत मांडले.

या क्रांती रँलीसाठी नर्मदा बचाव आंदोलन युक्रात, आझाद हिंद सेना, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, क्राईम सेटर व विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी हातात फलक धरून घोषणा देत सहभाग घेतला.

सचिन अल्हाट,राजु सय्यद, कबिर खान, नासिर शेख, जानभाई, जोसेफ पाँल (आँल इडिया काँग्रेस  मायनॉरिटी वरकर्स गृपचे राष्ट्रीय अध्यक्ष) व त्याचे पदाधिकारी, सुहेल जाफरी, शोएब शेख साहिल मणियार, शानु पठाण  जालिदर वाघमारे इत्यादींनी परिश्रण घेतले. 

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने