पुण्यातील कोंढव्यात खळबळजनक घटना, अल्पवयीन मुलीला मावशीने प्रियकराच्या मदतीने दाखवले पॉर्न व्हिडीओ व केले अश्शील वर्तन.

पुणे/कोंढवा- पुण्यातील कोंढवा येथे खळबळजनक प्रकार उघड झाला असून एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून अश्शील वर्तन करून मावशीच्या नात्याला काळिमा फासला आहे.

मावशींच नात हे पवित्र, मायेचं आणि विश्वासाचं  मानलं जातं. त्यामुळे तर आई नसावी पण मावशी असावी असे म्हंटलं जातं.! पण या मावशीने मात्र  मित्राच्या मदतीने केलेल्या या घरणास्पद कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा येथील एका महिलेने आपली चार मुलं एप्रिल ते जुन दरम्यानच्या काळात बहिणीकडे राहण्यास पाठवले होते.

दरम्यानच्या काळात मुलीच्या मावशीने तिच्या प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हीडीओ दाखवून अश्शील वर्तन केले. या प्रकाराने ती मुलगी धास्तावलेल्या मनस्थिती वावरत होती.

लॉकडाऊन शिथील झाल्या नंतर मुलगी आईकडे आली असता ती तणावाखाली होती.कांही दिवसानंतर त्या मुलीने आईला तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलीची मावशी ही घटस्फोटीत असून ती उंट्री या परिसरात मित्रां सोबत राहत असते. मुलीच्या आईने बहिणीच्या व तिच्या मित्रा विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने