पुणे/कोंढवा-
पुण्यातील कोंढवा बु.येवलेवाडी प्रभागतील 70 वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्याने त्यांच्या घरात मित्र परिवारात आनंद साजरा करण्यात आला.
पुण्याच्या कोंढवा येवलेवाडी प्रभागातील आजोबांना मागील 15 दिवसापूर्वी कोरोना झालेल्या आजोबांच्या नात्वाचा नगरसेवक जगताप यांना फोन आला.
दोन दिवसांपासून त्याच्या आजोबांना ताप असल्याचे त्याने सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ततात्काळ त्यांना कोंढवा येवलेवाडी शेत्रिय कार्यालय अंतर्गत डी.जे. कॉलेज मधे स्वॅप टेस्टिंगसाठी पाठवण्याची व्यवस्था केली.
स्वप टेस्ट केल्या नंतर आता आजोबांना ठेवायचे कोठे हा प्रश्न होता. कारण आजोबांचे घर तर छोटं आणि रिपोर्ट सुद्धा येणे बाकी होते.आणि घरातील लोकांना संसर्ग होण्याचा ही धोका नाकारता येत नव्हता.
त्यामुळे आजोबांना टिळेकर नगरच्या सिंहगड स्कूल मधील विलगीकरण कक्षात मध्ये दोन दिवस ठेवण्यात आले.दोन दिवसानंतर आजोबांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला.
त्यामुळे आजोबांना सिंहगड कोविड केअर सेंटर या ठिकाणी दाखल केले गेले. त्यानंतर घरातील इतर पाच लोकांची टेष्ट केली असता त्यांना पण कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
परिसरात खळबळ उडाली. त्यामुळे त्यांना ही सिंहगड किविड केअर सेंटर याठिकाणी कोरणटाईन करण्यात आले. या प्रकारानंतर दरम्यान परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रभागाचे नगरसेवक जगताप यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊ तात्काळ परिसरात सेनेटाईजरची फवारणी, स्वछता व कडक लोकडाऊन साठी लोकांना प्रवृत्त केले.
त्यामुळे नागरिकांच्या सहकार्यातून आणि प्रशासनाच्या नियोजन बध्द उपाय योजनेमुळे प्रभागात कोरोनाला हरवण्यात यश आले.
दहा दिवसाच्या उपचारा नंतर आजोबा आणि त्या घरातील सर्व मंडळी कोरोनामुक्त होऊन सुखरुप घरी परतले आहेत.
नगरसेवक जगताप यांनी प्रत्यक्ष आजोबाच्या घरी जाऊन घरच्यांची विचारपूस करून, कोरोनाच्या लढाईत 70 वर्षीय आजोबांनी बाजी मारली त्यांचे खास अभिनंदन केले.