मुंबई –कॉलर ट्युनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. त्या कॉलर ट्यूनने आता अनेक जण त्रस्त होत आहेत. महत्वाच्या कामा संदर्भात संपर्क होण्यासाठी ताटकळत राहवे लागते.
त्यामुळे ती कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावे असे नांदगावकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून दूरसंचार विभागाची कॉलर ट्यून गेली सहा महिने झाले सर्वांच्या मोबाईल वर सुरू आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारात या ट्यूनमुळे महत्वाची माहिती नागरीकांना मिळत गेली.
परंतु आता नागरिकांमध्ये जागृती झालेली आहे.
अनेक प्रकारच्या जाहिराती उपलब्ध आहेत. आणि राज्यातील व्यवहार पण सुरळीत होत असल्याने महत्वाचे फोन लागण्यास व येण्यास विलंब होत आहेत.
त्यामुळे ती कॉलर ट्यून बंद करण्याची गरज आहे. असे नागरिकांतुन ही बोलले जात आहे.