पुणे - राज्यात स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापनदिन विविध ठिकाणी साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण केले. तर मंत्रालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते ध्वजारोहण झाले.
मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि श्रीमती रश्मी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
पुण्यात जिल्ह्या मुख्य शासकीय कार्यालयाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
पुण्याच्या कौन्सिल हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलापानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. (photo twitter)