पुणे- पुण्यातील शिवाजी नगर येथिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भवन मध्ये 74 व्या. स्वातंत्र्य वर्धापन दिन रविवार दि.१५ ऑगष्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजरोहन कार्यक्रमा नंतर आयोजित कार्यक्रमात हडपसर विधानसभा काँग्रेसच्या अपंग सेल कार्यकरणीची निवड करण्यात आली.
या निवड कार्यकारणीत हडपसर काँग्रेस च्या अपंग सेल विभागाच्या अध्यक्षपदी मा.सौ.मिनाक्षी अक्षय शिंदे यांची तर उपाध्पक्षपदी मा.सौ. संगिता विठ्ठल चव्हाण याची निवड करण्यात आली आहे .
व सरचिटनीस म्हणुन विजय इंगळे आणि चिटणीस म्हणुन अक्षय प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष मा. श्री रमेशजी बागवे व पुणे शहर काँग्रेस महिला अध्यक्षा मा.सौ. सोनाली ताई मारणे यांच्या हस्ते पद वाटप करण्यात आले. निवड झालेल्या कार्यकर्त्यांना पुडील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पुणे शहर अपंग सेल विभागाचे अध्यक्ष मा.श्री.न्यानेश्रर निम्हण,पुणे शहर महिला काँग्रेस सचिव मा.सौ.कांचन बालनायक तसेच हडपसर विधानसभा काँग्रेस सरचिटनीस मा.श्री देवदास दत्तात्रेय लोणकर उपस्थित होते. हडपसर विभागाचे कांही कार्यकर्ते उपस्थीत होते.