पुणे दि.२ जुलै- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे(बार्टी )मार्फत MPSC परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास सुरू करण्यात केलेले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सर्व क्षेत्रात अनेक प्रकारचे नुकसान झालेले आहे.कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे एमपीएससीची परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये देखील खंड पडला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात यावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.
त्यापार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ऑनलाइन क्लासेस सुरू करण्याच्या सूचना बार्टीला दिल्याने ‘बार्टी’ने ऑनलाईन एमपीएससी क्लासेस सुरू करीत आहे.
त्यासंदर्भात एमपीएससी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे.
ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी सुरू करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात या क्लासेसचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांच्या कडून देण्यात आली आहे.