ठार मारण्याची धमकी देऊन न्हरे येथे विवाहितेवर बलात्कार कोंढव्यातील आरोपीला अटक

कोंढवा दि.३,जुलै-
कोंढवा खुर्द ज्ञानेश्वर नगर येथे राहणाऱ्या प्रबोधन सुनील गोरे (वय २६)यांस विवाहितेवर बलात्कार केल्याच्या फिर्याफीवरून सिंहगड रस्ता पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या मगितीवरून फिर्यादी महिला ही कोंढवा खुर्द पुणे येथे पती व मुली सह राहतात. आणि आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र असल्याने त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते.
फिर्यादी महिलेला धमकी देऊन वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हंटलेल आहे.
मे महिन्यातील सहा तारखेला फिर्यादी महिला ही न्हऱ्हेच्या दवाखान्यात पायाला लागलेल्या उपचारासाठी गेली असता तेथे आरोपी बाहेर थांबलेला होता. 
त्याला ओळख दाखविता आरोपीने तू मला आवडतेस असे म्हणून, तुझ्याशी मला लग्न करायचे आहे असे सांगितले.पण फिर्यादी महिलेने लग्न झाल्याचे सांगितले तरी ही, आरोपीने तू  माझ्या सोबत नाही आलीस तर तुझ्या मुलीला व पतीला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. व गाडीवर बसवून न्हरे येथील लॉजवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
फिर्यादि ने पतीला ही माहिती सांगितल्या नंतर पतीने धीर देऊन पोलिसात तक्रार देण्यास सांगितले.
फिर्याफीने दिलेल्या तक्रारीवरून महिलेच्या संम्मती शिवाय, जबरदस्तीने, वेळोवेळी, शारीरिक समंध प्रस्थापित केल्याने आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला त्यावरकरून अटक करण्यात आली आहे. पुडील तपास पो.उपनिरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने