राजगृह’ तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपीला कल्याण मधुन अटक

Online
राजगृह’ तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

मुंबई  : दि.२३-
दादर येथील हिंदू कॉलनितील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास"असलेल्या राजगृहावर" 7 जुलै रोजीच्या सायंकाळी
दगडफेक व तोडफोड झाली होती.

त्या दगडफेकित खिडक्या,कुंड्यातील झाडे व सीसीटीव्ही केमेराची मोडतोड करण्यात आली.
त्यामुळे महाराष्ट्रभर या घटनेमुळे संतापाची लाट निर्माण झाली.

परंतु वंचितचे सर्वेसर्वा तथा डॉ.आंबेडकर यांचे नातू सामंजस्य भूमिका घेऊन जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले करून तपासासाठी पोलिसांना मदत केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री देशमुख यांनी हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांचा शोधून काडण्याचे पोलिसांना आदेश दिले.
राजगृहाच्या सीसीटीव्ही पुटेजमध्ये हल्ला करताना दोन तरुण स्पष्ठ दिसत होते.
त्याच्या आधारे माटुंगा पोलिसांनी शोध मोहीम राबवून उमेश जाधव वय(35) याला 9 जुलै रोजी अटक केली.

तर दुसरा मुख्य आरोपी विशाल अशोक मोरे ऊर्फ विठ्ठल काण्या (वय 20) यााला दि.२२-जुलै रोजी कल्याण मधुन अटक करण्यात आली आहे.

आशा प्रकारे या घटनेतील दुसराही आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.सीसी टीव्ही फुटेज आणि सह-आरोपी उमेश याच्या माहितीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी मोरेला कल्याण स्थानक परिसरातून अटक केली आहे.
 पुडील तपास माटुंगा पोलीस करीत आहेत.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने