बकरी ईद संदर्भात मार्गदर्शक तत्व,सूचना जाहीर करण्यात आले असून,सर्वांनी नियमाच्या अधिन राहून ईद साजरी करावी. -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११



राज्यातील मुस्लिम बांधवानी बकरी ईद साजरी करताना ती साधे पणाने नियमाच्या अधिन राहून करावे. किंवा शक्यतो  ईद यावेळी प्रतीकात्मकरित्या करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बकरी ईद संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक तत्वे अर्थात सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचे व ऐनवेळीच्या सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शासनाने बकरी ईद साजरा करण्या संदर्भात कांही मार्गदर्शक तत्व-नियम घालुन दिले आहेत:-

१) कोविड-१९मुळे उधभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईद ची नमाज मज्जीद,ईदगहा किंवा सार्वजनिक ठिकाणी न करता आपल्या घरात अदा करावी.

२) बकरी ईद शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानीने करावी.

३)सद्या बाजार बंद असल्याने नागरिकांनी जनावरे खरेदी करताना ऑनलाईन किंवा फोन द्वारे खरेदी करावेत.

४) प्रतिबंध कॅन्टोमेंट क्षेत्रात लागू असलेले सर्व नियम कायम राहतील,बकरी ईदसाठी कोणतीही शिथिलता नसेल.

५) बकरी ईदच्या धर्तीवर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये व गर्दी करू नये.

६) विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदतकार्य विभाग, पुनर्वसन विभाग,आरोग्य यंत्रणा,पर्यावरण विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग ,पालिका व पोलीस प्रशासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधन कारक राहनार आसणार आहेेेत.असे सूचित करण्यात आले आहेत.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने