वाढ दिवसाचा खर्च विविध शिबिरे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करा -मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११


मुंबई :  २७ जुलै रोजी शिवसेना प्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जनता आणि प्रशासन त्याला लढा देत आहेत.राज्यातील जनता संकटात असतांना वाढदिवस साजरा करणे उचित ठरणार नाही.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी जाहिरात बाजीवर खर्च न करता जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, रक्तदान शिबीर घेऊन,प्लाझ्मा दान शिबिरे घेऊन जनसेवेच्या मद्यमातून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी  केले आहे.
शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात, विविध सुभेच्छादर्शक पोष्टर्स लावून अभिनंदनाचा वर्षाव करून केला जात असतो.
यावेळी शिवसेना राज्याच्या सत्तेत आहे. त्यामुळे प्रतिवर्षा पेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होण्याची शक्यता होती.
मात्र राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये.तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी.असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे.आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले.



Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने