राज्यातील स्थानिकांना मिळणार रोजगाराच्या संधी, एमआयडीसी महाजॉब्स वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले ऑनलाईन लोकार्पण

मुंबई दि.०६ जुलै- 
राज्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपल्ब्ध व्हावी व उद्योगांना स्थलांतरित कामगारांची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
दि.६ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते त्याचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात केले आहे.
यावेळी उद्योगमंत्री मा.ना.सुभाष देसाई,कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. ना. नवाब  मलिक,उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उपस्थित होते. 
राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहे. व  नवीन उद्योग सुरू करनार्यांना महापरवाना देण्याची प्रकिया ही सुरू आहेत. 
अश्या वेळी कामगारांची कमतरता भासू नये, विशेषतः स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ‘महाजॉब्स’ वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे.
इच्छुकांनी महाजॉब पोर्टल अपलोड करून त्यात आवश्यक माहिती नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून नोकरीची ऑफर मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -
"देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो, की आणखी  काही महाराष्ट्रानं नेहमीच देशाला पारदर्शी  आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले आहे.
महाराष्ट्र, म्हाजॉब्स, व सरकार  महाविकास आघाडीचे, त्यामुळे महा फ़ॅक्टर आहे. आम्हीं जे करू ते भव्य-दिव्य करू."महाजॉब्स हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा आहे.
Aditi tatkre- मंत्री अदिती तटकरे यांनी, महिला असो किंवा पुरूष कामगार,महाजाॅब्स द्वारे आता १७ क्षेत्रातील ९०० हून अधिक प्रकारच्या रोजगाराच्या संधी कुशल,अर्धकुशल व अकुशल कामगारांना उपलब्ध होणार आहेत. देशातील हे पहिले व एकमेव असे पोर्टल असून युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 
Subhas Desai- राज्याचे उद्योगमंत्री मा.सुभास देसाई यांनी महाजॉब्स पोर्टल हे उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी देण्यासाठीचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हंटले आहे.
बाळासाहेब थोरात-उद्योग आणि अर्धं-कुशल, कुशल मनुष्यबळ यातील दरी कमी करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post