कामगारांना कामावरून काढू नका,शिवाय नवे कामगार भर्ती कताना प्रथमतः जुन्याना प्राधान्य द्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जगभरात कोरोनाची परिस्थिती विचित्र असताना  उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये.कारण उद्योगव्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांना काढू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

"एकीकडे कारखाने परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहे,
अशा स्थितीत त्यांना नोकऱ्या देऊन व्यवसाय सुरु करा.पण नव्या नोकऱ्या देताना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका.असे  य त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योगमंत्री मा.ना.सुभाषजी देसाई,परिवहन मंत्री मा.ना. अनिलजी परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई ,सहभागी होते.



Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post

Popular Items