पुणे/कोंढवा दि.४ जुलै-
पुण्यासह कोंढवा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.
पुण्याचे शिलेदार अर्थात प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहळ सह त्यांचे घरातील आठ सदस्य, आणि कोंढव्यात भाजपचे माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर व त्यांचा मुलगा यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.असे त्यांनी स्वतः ट्विटरवर ट्विट करून सांगितले आसून ते रूग्णालयात उपचार घेत आहेत.
कोंढवा बु.गावठाण च्या चारी बाजूने यापूर्वीच कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी म्हणून वाहतूक रस्ते बंद करण्यात आलेला आहे. माजी आमदार व मुलाच्या टेष्ट मध्ये कोरोनाची लक्षणे आढळुन आल्याने सर्वसनाण्यांच्या काळजी भर पडली आहे. त्यामुळे परिसरात निर्जंतुकीकरण करून घेण्याची मागणी केली जात आहे.
सदयाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मुंबई नंतर पुणे आणि पुण्यात पेठां नंतर कोंढवा परिसर कोरोनाचा स्पॉट बनतो की काय अशी शंका घेतली जात आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे.
माजी आमदार योगेश टिळेकर हे सर्वांना सोबत घेऊन, मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व असून ते चांगले वक्ते आणि नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप कार्यकारणीत भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
हडपसर मतदारसंघात तरुण वर्ग त्यांच्या सोबत असतात. लवकरच ते बरे व्हावेत म्हणून अनेक कार्यकर्ते सदिच्छा व्यक्त करीत आहेत.
तर योगेश टिळेकर यांनी आपण व मुलगा दोघांची प्रकृती चांगली असून लवकरच तुमच्या आशीर्वादाने बरे होऊन घरी येईन,तुंही स्वतःची काळजी घ्या असे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.