पौर्णिमा म्हणजे अष्टशीलाचे पालन करणे. म्हणजे पौर्णिमेचा हा दिवस अष्टशील पालन करण्याचाच दिवस असतो. बौद्धधम्म संस्कृति प्रमाणे प्रत्येक पौर्णिमा बौद्धांचा पवित्र सण आहे. कारण बौध्द धम्मात ज्या काही महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्यांचा प्रत्येक पौर्णिमेशी फार जवळचा संबंध आहे. प्रत्येकांनी विहारात जाऊन तिथे उपस्थित असलेल्या भिक्खूंकडून अष्टशील ग्रहण करुन पुढील चोवीस तासांपर्यंत आठ शीलांचे काटेकोरपणे पालन करावे.
या भूमीवर अनेक बौद्धधर्मीय राष्ट्रे आहेत. त्यात श्रीलंका असेल, थायलंड असेल, ब्रह्मदेश असेल, म्यानमार,किंवा जपान आसेल या सर्व देशात दर पौर्णिमेला सरकारी सुट्टी दिली जात असते. याचे कारण असे की, या दिवशी प्रत्येक बौद्धांना पहाटे सूर्य उगविण्याच्या आधी बुद्धविहारात जाऊन अष्टशील ग्रहण करता आले पाहिजे.
तेथील पौर्णिमेचा दिनक्रम- पोर्णिमेच्या दिवशी विहारात अष्टशील ग्रहण केल्यानंतर सर्व बौध्दजन आपापल्या घरी जातात. आपापली दैनंदिन कामे उरकून पुन्हा विहारात येतात. अकरा वाजेपर्यंत पूजा वंदना घेऊन भिक्खूंची धम्मदेसना श्रवण करतात.अकरा वाजता घरी जातात.बारा वाजेच्या आत भोजन प्राशन करून.थोडा आराम केल्यानंतर पुन्हा विहारात येतात. वंदना करून धम्मश्रवण करतात.
यादिवशी त्यांना रात्रीचे भोजन करण्याचे नसल्याने पुन्हा ते लोक रात्री बुद्धविहारात येतात आणि उशीरापर्यंत धम्म श्रवण करतात.म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशीचा त्यांचा संपूर्ण वेळ हा विहारातच जात असतो.असे केल्याने कुशल कर्म तर संचित होतेच,परंतु शारीरिक लाभसुद्धा होतात.
आपल्याकडे ब-याच बौद्धजनांना अष्टशीला बद्दल म्हणावी तितकी माहिती नाही.कारण या दिनचर्याची अनेकांना कल्पना नाही. आणि ज्यांना कल्पना आहे ते अष्टशील पालनाकडे लक्ष देतातच असे नाही.
त्यामुळे आजच्या सुसक्षित प्रत्येक बौद्धजनांनी अष्टशील अचरणांची गरज आहे.
पौर्णिमा दिवशी पालन करावयाचे अष्टशील-
१) पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि!
अर्थ:- मी अष्टशील ग्रहण केल्यापासून कोणत्याही प्राण्यांची कायेने किंवा वाचेने अथवा मनाने हत्या करणार नाही, याउलट मी सर्व प्राणिमात्रांशी मैत्री करीन, त्यांच्यावर दया करीन.
२) अदिन्नादाना वेरमणि
सिक्खापदं समादियामि!
अर्थ:- मी चोरी करणार नाही, त्याऐवजी दान करीन.
३) अब्रह्माचरिया वेरमणि,
सिक्खापदं समादियामि!
अर्थ:- मी लैंगिक विचार करणार नाही, तर मी माझ्या शरीराला आणि मनाला शुद्ध ठेवीन.
४) मुसावादा वेरमणि
सिक्खापदं समादियामि!
अर्थ;- मी माझ्या वाचेद्वारे/वाणीने कुणाची निंदा, चुगली करणार नाही, कोणाशी कठोर बोलून कुणाचे मन दुःखी करणार नाही, आणि खोटे बोलणार नाही, तर मी माझ्या वाणीने सत्य तेच बोलीन.
५) सुरामेरयमज्ज पमाद्ठ्ठना वेरमणि,
सिक्खापदं समादियामि!
अर्थ:- मी कोणत्याही प्रकारची दारू व नशिल्या पदार्थांचे सेवन करणार नाही. तर मी माझे शरीर पवित्र व निर्मळ ठेवीन.
६) विकाल भोजना वेरमणि,
सिक्खापदं समादियामि!
अर्थ:- मी दुपारी बारा वाजेनंतर भोजन करणार नाही, अर्थात दिवसातून बाराच्या आंत एकदाच भोजन घेईन.
७) नच्च, गीत, वादित, विसूक, दस्सना माला गन्ध, विलेपन, धारण मण्डन, विभूसनठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि!
अर्थ:- मी नाच, गाणे, वाद्य, अश्लील दृश्य पाहणार नाही, ऐकणार नाही.तर मी माझ्या शरीराला या दिवशी कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाने सजविणार नाही, केसात फुलांची माला घालणार नाही.
८) उच्च सयना महा सयना वेरमणि,
सिक्खापदं समादियामि!
अर्थ:- मी या दिवशी उंच आसनावर किंवा मौल्यवान आसनावर झोपणार नाही, तर खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपेन.
अशाप्रकारची जणकल्याणाची शिकवणपोर्णिमेला आत्मसात केली जाते. पौर्णिमेचे महत्व जाणून अष्टशीलांचे पालन करून उपोसथ करणे महान कल्याणकारक आहे.