पुणे दि.४ जुलै- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांना थोडासा ताप आल्याने त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आलेला आहे.असे त्यांनी दि.३ रोजी ट्विटरवर ट्विट केले होते.
दुसऱ्या दिवशी दि.४ जुलै रविवार कुटूंबातील आठ सदस्यांना ही बाधा झालेली आहे.
पुण्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्कतेने कामाला लागली आसून,या घटनेमुळे पुणेकरांच्या काळजीत आणखीनच भर पडली आहे.
पुणेकरांचे जीव कोरोना पासून सुरक्षित राहवे आणि कोरोना बाधितांच्या उपचारासाठी पुण्याचे महापौर श्री.मुरलीधर मोहळ सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे आसता.धाडसाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पालिका यंत्रणेच्या माध्यमातून ग्राउंड लेव्हल ला उतरून सक्रिय काम करीत असतांना त्यांनाही आताकोरोनाची लागण झाली आहे.
पुण्यात कोरोनाचा दिवसेंदिवस आकडा वाढत आहे.अनेक कोरोना योध्ये कोरोना बाधित होत आहेत. आता पुण्याच्या शिलेदारांनाच कोरोनाची बाधा झल्याचे समोर आले आहे. त्यांला रोखण्यासाठी पालिका प्रशासन अहोरात्र परिश्रण घेत आहेत.पालिका प्रशासनाच्या सोबत महापौर ग्राऊंड लेवल वर अधिकारी कार्यकर्ते,यांच्याशी भेटीगाठी,मार्गदर्शन करीत आहेत त्यांना थोडा ताप आला असता त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली.त्यात त्यांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आलेला आहे.असे त्यांनी स्वतः ट्विटर वर ट्विट केले आहे.