अण्णा भाऊ साठे त्यांना भारतरत्न द्या.विधानसभा अध्यक्ष - नाना पाटोळे



मुंबई दि.१७-
आपल्या प्रत्ययकारी लेखन प्रतिभेने आणि विविधांगी साहित्य कला 
शाहिरीच्या माध्यमातून तमाम संपूर्ण शोषित-पीडित-वंचित समाज घटकांची व्यथा,वेदना समर्थपणे मांडनाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न देण्याची मागणी सर्व स्थरातून केली जात आसून शिफारस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.                             

दि.१६जुलै रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या शिफारशीत पाटोळे यांनी लिहीले आहे की ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता येत्या १ऑगष्ट रोजी होत आहे. 
साहित्य आणि समाजकारणात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान वोशेष उल्लेखनीय आहे.
मागास समाजातून पुढे आलेल्या आदरणीय अण्णाभाऊ साठे वंचीत समाजाच्या व्यथा,वेदना आपल्या साहित्यकृतीतून अतिशय परिणामकारकरित्या मांडल्या.
त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी राज्य मंत्री मंडळाने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी शिफारस केली आहे.




Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post