वृद्ध कलावंत व साहित्यिकांचे मानधन त्यांच्या बॅंक खात्यात आठ दिवसात जमा होतील,-वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची माहिती

Photo ट्विटर


मुंबई "दि.१६-
शासनाकडून वृद्ध कलांवंतांच्या मानधणाची रक्कम सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यात आले असून आठवड्यात ते कलावंतांच्या बॅंक खात्यात जमा होतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात अनेक कलावंत आपली संस्कृतीक कला जोपासत आहेत. त्याच सोबत ते आपल्या कलेतून समाज प्रबोधन करीत असतात.
त्यांच्या वृद्धपकाळात शासनाकडून कांही निकषांच्या आधारे दरमहा मानधन मंजूर केले जाते.त्यानुसार महाराष्ट्रातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत व साहित्यिक आहेत.
त्यांना त्यांच्या मानधना पैकी मार्च व एप्रिल महिन्यांचे रक्कम संबधित विभागाकडे एकत्रितपणे अदा करण्यात आले आहेत.
त्यामुळे त्यांना आठवड्याभरात बँक खात्यात जमा होईल,अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.
लॉक डाउनलोड च्या काळात त्यांना आधार होऊ शकतो.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items