पुण्यात "दलित पॅंथर" या लढाऊ संघटनेच्या स्थापनेचा ४८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

पुणे दि.१२जुलै- पुणे येथे जिल्हाधिकारी कार्याल समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जवळ "दलित पॅंथर" स्थापनेचा ४८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आकर्षक मोठा पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर विद्रोही साहित्यीक, कवी, लेखक आणि आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेता, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या तैलचित्रास पुष्पहार व फुलं वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी निलेश भाऊ आल्हाट यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन दलित पँथरचे महाराष्ट्र राज्य प्रदेध अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांनी केले होते.
कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यावेळी हा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items