जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणार १०लाख सानुग्रह अनुदान. -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


मुंबई दि.११ जुलै-
राज्यातील ज्या जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होत नाही, त्या कर्मचाऱ्यांना ज्यांची सेवा १० वर्षे पूर्ण होण्य आधी सेवेत असताना दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.
तशी अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

सद्याचे जीवन हे बेभरोशाचे आणि अनेक ज्ञात अज्ञात रोगराईंच्या सानिध्यात गुर्फतलेले आहे. त्यामुळे कधी,कुठे,कोणालाही अचानक मृत्यूला सामोरे जावे लागेक याचा भरोसा नाही.त्यामुळे त्या कुटूंबाची काळजी म्हणून प्रशासनाचा हा निर्णय त्या कुटूंबाला एक आधार देणारा ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा निर्णय हा निर्णय पेन्शन लागू नसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचाआणला जात आहे.



Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post