पुणे :दि,१० जुलै२०२०-
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाड होत असून,खबरदारी म्हणुन १३जुलैच्या मध्यरात्री 12 नंतर पुडील १० दिवस लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे निरदेश दिले आहेत.पिंपरी-चिंचवड,पुणे लगत असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये हा लॉकडाऊन राहणार आहे.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात दि,१०जुलै शुक्रवारी 'कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा' बैठक घेण्यात आली.त्यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड,पुण्यात कोरोनाचा वादाता प्रादुर्भाव यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली.व पुडील धोरण संदर्भात विचारविनिमय होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वीच पुण्यात लॉकडाऊनची शक्यता वर्तवली होती.कोरोनाचा प्रभाव असतानाही नागरिक मास्क न वापरता खुलेआम विनाकारण फिरत आहेत.
त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत जावुन,रुग्णांची संख्या वाढत आहे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी लॉकडाऊन करण्याचा निर्णय सुध्दा घ्यावा लागेल असा इशारा दिला होता