कोरोनाग्रस्त शवाचे अंतीम संस्कार करणाऱ्याना मानधन देण्याची मागणी



पुणे/कोंढवा दि.२२ जून- 

कोरोनामुळे निष्पाप जीवांचा दुदैवी मृत्यू होत आहेत. कोरोनाच्या भीतीने कांही नातेवाईकांनी अंतीम संस्कार करण्यास असमर्थता दर्शवली तर कांहीचे नातेवाईक उपलब्ध नसतात परंतु असे शव ज्यास्ती दिवस ठेवणे शक्य सुद्धा नसते. 

त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांचे माणुसकीच्या नात्याने, रीतसर परवानगी घेऊन त्यांच्या धर्मानुसार अंतिम संस्कार करण्याचे काम कांही सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते पार पाडत आहेत. त्यासाठी पेट्रोलिंग व इतर स्वतः खर्च करीत आहेत. त्यामुळे त्यांना शासनाने कांही तरी मानधन देण्यात यावे अशी मागणी इनक्रेडिबल समाज सेवक गृप ने केली आहे.

गेल्या ९६ दिवसापासून, सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते दिवसरात्र कोविड १९-च्या कालावधीत कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या मानवी शवाचे अंतसंस्कार करीत आहेत.आपल्या जिवाची व आपल्या परिवाराची काळजी न करता ज्या शवांचा अंतिम संस्कार करण्यास जवळचे नातेवाईक असमर्थता दर्शवतात अशांवर हे कार्यकर्ते स्वखुशीने अंतिम संस्कार करण्याचे काम करीत आहेत.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आशा संस्थांच्या समाज सेवकांना पुणे महानगरपालिका पालिकेने मानधन द्यावे अशी  विंनती करणारे निवेदन असलम इसाक बागवान इनक्रेडिबल समाजसेवक गृप यांनी घन कचरा विभाग पुणे महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने