उस्मानाबाद दि,२६-
संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना कोवीड -19 च्या अनुषंगाने रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात घ्यावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री -अमित देशमुख यांनी दिले.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोवीड-19 संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताबा श्री देशमुख यांनी ही माहिती दिली.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करीत असून उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबीची पूर्तता कराव्यात.कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी लॅब मध्ये मशीन लवकरच बसविण्यात येणार आहे.त्यामुळे त्याचे ट्रेनिंगला कोणाला तरी लातूर किंवा सोलापुरला पाठवण्यात यावे.
त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालये सुरू आहेत की नाहीत खात्री करा करून योग्य उपचार करतात का? याची शहानिशा करावी.आरोग्य विभागाकडे औषधीचा पुरेसा साठा असायला हवे. तो पुरेसा उपलब्ध करून ठेवा. संपूर्ण जिल्ह्यात विलगीकरण व होम कोरंटाईन ची परिस्थितीची माहिती घेऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची काळजी घ्या. होम कोरानटाईन केलेल्या व्यक्तींशी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचे निर्देश श्री देशमुख यांनी यावेळी दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने आज पर्यंत केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही वडगावे यांनी प्रत्येक गावस्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
या बैठकीस खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, तहसिलदार गणेश माळी,न.प.उस्मानाबादचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे आदी उपस्थित होते.