अपघाती मयत शिक्षकेस प्रत्येकी एक कोटीची मदत, व शिक्षक विद्यार्थ्यांचा प्रत्येकी ५० लाखाचा विमा उतरवा. उस्मानाबाद वंचीत बहुजन आघाडी ची मागणी

दोन्ही मयत शिक्षकांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये मदत दयावे, पुडील काळात विद्यार्थी व शिक्षक यांच्या संरक्षणाची खबरदारी घेऊन प्रत्येकी पन्नास लाखाचा विमा उतरवा.- मारुती बनसोडे 

नळदुर्ग दि.२१- अणदूर येथील अपघातात मृत्यू पावलेल्या शिक्षिकांना कोविड शहीद म्हणून जाहीर करून त्यांच्या दोन्हीं कुटुंबाना शासनाने प्रत्येकी एक कोटी रुपयाची मदत दयावी. विद्यार्थी व शिक्षक यांच्या संरक्षणाची खबरदारी घेऊन  प्रत्येकी पन्नास लाखाचा विमा उतरविण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात अली आहे.

तुळजापूर तालुक्यातील अणदूर वत्सलानगर(चिवरी पाटी) येथील जि.प.प्रा. शाळेतील शिक्षिका शशिकला नागेश कोळी वय ४२ व रोहिणी शंकर सपाटे वय ४० या दि.१९ जून रोजी शाळेत विद्यार्थ्यना पुस्तके वाटप करुन सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने सोलापूरला जात असता रस्त्यात सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवर बाभळगाव ता. तुळजापूर येथे त्यांच्या स्कुटरला वाहनांची धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुरदैवी मृत्यू झालेला आहे. 

कोवीड १९ च्या या कालावधीत कर्तव्य बजावुन घरी जात असताना त्यांचा अपघात झालेला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना कोवीड शहीद म्हणून घोषीत करावे. आणि त्यांच्या दोन्हीं शिक्षकेच्या कुटुंबाना प्रत्येकी एक कोटी रुपयाची मदत करावी. व कोरोनाच्या संकटकाळात शाळा सुरू करीत असताना विद्यार्थी व शिक्षक यांच्या संरक्षणाची योग्य ती खबरदारी घेऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्येकी पन्नास लाखाचा विमा उतरविण्याची मागणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्हा वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने अध्यक्ष मारुती वनसोडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वरील आशयाचे निवेदन पाठवले असल्याचे स्टार महाराष्ट्र नवक्रांतीशी माहिती  देताना सांगितले.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने