मल्लीनाथ गुरवे - B.J.M.A.Pol.Science) यांजकडून
मुरूम ता. उमरगा- जि. प. स्पेशल शाळा, भीमनगर मुरूम येथे चिमुकल्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. निर्मलकुमार जगन्नाथ लिमये यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तुपेरे मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक राहुल गायकवाड सर, सौ. शिवकर मॅडम, सौ. पोतदार मॅडम, शिवाजी गायकवाड सर, थिटे सर, देशमाने सर, रुपचंद खायडे सर, बोईनवाड सर, तसेच सूरज कांबळे आणि अरविंद कांबळे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. पालकांनीही मुलांच्या आनंदात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरात आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच या आनंद मेळाव्याच्या यशाची पावती देत होते.

