पुणे : बोपोडी परिसरातील नव्याने बांधलेले संजय गांधी हॉस्पिटल पूर्णतः सुसज्ज असूनही अद्याप सुरू झालेले नाही. या विलंबामुळे नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आम आदमी पार्टीतर्फे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्थानिक महिलांसह पक्ष कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलजवळ काल तीव्र आंदोलन केले.
प्रसूतीसाठी तातडीची सुविधा नाही — महिलांची मोठी समस्या
खडकी, बोपोडी, औंध या भागांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय महिलांसाठी तातडीच्या प्रसूतीसाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत.
त्यामुळे अत्यावश्यक स्थितीत महिलांना-
-
पिंपरी-चिंचवड, कमला नेहरू रुग्णालय (पुणे),ससून रुग्णालय,येथे हलवावे लागते.
त्या तुलनेत बोपोडीमध्येच उभी राहिलेली सुसज्ज इमारत वापरात आणल्यास याच परिसरात त्वरित प्रसूती सेवा उपलब्ध होऊ शकते, अशी ठाम मागणी आंदोलनात करण्यात आली.
एक्सीडेंट केसेससाठी महत्त्वाचे स्थान
हे हॉस्पिटल थेट महामार्गालगत असल्याने अपघातग्रस्त रुग्णांना येथे उपचाराची मोठी संधी निर्माण होऊ शकते.
गोल्डन अवरमध्ये उपचार सुरू झाल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढते — त्यामुळे अपघात उपचार केंद्र म्हणून हॉस्पिटल सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
महापालिका बांधते, पण चालवत नाही—आप
पुणे महानगरपालिका इस्पितळांची इमारत बांधण्यासाठी खर्च करते, परंतु ती खाजगी व्यवस्थापनाकडे सोपवण्याचा कल दिसतो, असा आरोप आप नेते मुकुंद किर्दत यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, “या परिसरातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी मोफत, दर्जेदार सरकारी रुग्णालय ही अत्यंत गरजेची सुविधा आहे.”
आंदोलनात सहभागी
या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे —
मुकुंद किर्दत, अॅनी अनिश (महिला उपाध्यक्ष), विकास चव्हाण (संघटक)
यांच्यासह शितल कांडेलकर, श्रद्धा शेट्टी, अक्षय शिंदे, नौशाद अन्सारी, सतीश यादव, सुरेखा भोसले, श्रीकांत भिसे, राहुल तिवारी, शंकर थोरात, पूजा वाघमारे, मनोज थोरात, मिलिंद सरोदे, वाहिद शेख, संजय कोणे, मनोज शेट्टी, विल्सन अलेक्स, मिलिंद ओव्हळ, खैरून शेख, माया जाधव आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

