कोंढवा येथे आझाद रिक्षा चालक संघटना व सर्वपक्षीय नागरिकांकडून डॉ.बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली

पुणे : सामाजिक चळवळींचे ज्येष्ठ नेते, कामगारांचे आधारस्तंभ आणि प्रखर विचारवंत डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक, कामगार आणि सर्वसामान्य जनतेत हळहळ व्यक्त होत आहे. काल पुण्यात त्यांचे दुःखद निधन झाले.

या पार्श्वभूमीवर कोंढवा येथील ज्योती चौकात आझाद रिक्षा चालक संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक आघाडी (शरद पवार गट) आणि अखिल भारतीय एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी डॉ. आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगताप, आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफिकभाई पटेल, अखिल भारतीय एकता मंचाचे छबिलभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरशद अन्सारी तसेच राजेंद्र बाबर, उबाठा मजहर मणियार, काशीफ सय्यद, आसिफ पटेल, आयाज शेख, अजीम पटेल, जावेद शेख व ब्रह्म एकजुबेरन्स रिक्षा स्टॅन्ड येथील रिक्षाचालक सहकारी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी यावेळी डॉ. बाबा आढाव यांच्या व्यापक सामाजिक कार्याचा, कामगार हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचा आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा गौरव केला. "बाबांसारखे नेतृत्व पुन्हा निर्माण होणे कठीण असले तरी त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीने पुढे नेला पाहिजे," असे मतही व्यक्त करण्यात आले.

या श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी डॉ. आढाव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, मेणबत्ती लावून त्यांना विनम्र अभिवादन केले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post