कोंढवा-
येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तीन आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी, पुणे) याचा रस्ता अडवून जुन्या वादाच्या कारणावरून एकूण सात आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात दगड घालून आकाश चाबुकस्वार याचा निर्घृण खून केला.
या प्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १८९ (२), १९०, १९१ (२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५ यांच्या आदेशानुसार तात्काळ दोन तपास पथके तयार करण्यात आली. सपोनि राकेश जाधव व पोलीस अंमलदार सुजित मदन यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे—
आदित्य सुभाष गायकवाड (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा, पुणे)
गणेश किशोर मोरे (वय २०, रा. कात्रज-कोंढवा, पुणे)
कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे (वय १९, रा. तुळजाभवानी निवास, कोंढवा, पुणे)
इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असून तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सुषमा हिंगमिरे, संदीप पवार, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, विजय खेगरे, अनिल बनकर, मयूर मोरे, अमोल तावरे व अक्षय शेंडगे यांनी सहभाग घेतला.