आलूर ता. उमरगा जिल्हा परिषद शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

मुरूम/प्रतिनिधी

उमरगा तालुक्यातील आलूर येथील जिल्हा परिषद  प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ अlसा दुहेरी कार्यक्रम  सोमवारी दिनांक सतरा रोजी उत्साहात पार पडला. एका दिवसाचे शिक्षक म्हणून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शासनाने शाळा चालवली. परिपाठापासून ते मध्यान्ह भोजनापर्यंत सर्वच कार्यभार विद्यार्थी शिक्षकांनी पार पाडला. विद्यार्थ्यांमधून स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक संतोष विरभद्र गुंडगे,उपमुख्याध्यापिका तेजस्विनी उमेश खजुरे आणि पर्यवेक्षिका  ईशा महेबूब पठाण यांनी उत्तमरीत्या शाळेचा कार्यभार सांभाळला.  

विद्यार्थी शिक्षकांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे सर्व विषयाचे अध्यापन केलेमध्यान्ह भोजनामध्ये सर्व प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. स्नेह भोजनानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी  दहावीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ कार्यक्रमाचे  सुंदर आयोजन केले.

 याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरनाळवाडीचे मुख्याध्यापक श्रीकांत कनकधर यांचे मार्गदर्शन  केले.यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाणावलेल्या  डोळ्यांनी आपल्या भाषणा द्वारे दहा वर्षांचा शालेय अनुभव सांगितले

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाचा निरोप घेताना प्रशालेस भाषण करण्याकरिता एक डायस आणि शंभर फुटांचे दोन कोठारी पाईप शाळेला भेट दिले.

याप्रसंगी इ 9 वी चे सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षक  नलवाड , जे.एम.मुल्ला आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक गाडेकर , शिक्षक स्वामी, वाकडे , काबडे, बलसुरे, शिक्षिका श्रीमती डिगरे , श्रीमती मुरशद , श्रीमती गारोळे यांच्यासह प्रशालेचे  सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने