सम्राट अशोक बुद्ध विहार, त्रिरत्न सोशल फाऊंडेशन आणि माता रमाबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता बुद्ध विहारात कार्तिकी पौर्णिमा व बौद्ध धम्म संस्कृतीच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी आयु. जाधव सर यांनी “बुद्ध धम्माचा अष्टांगिक तत्वमार्ग” या विषयावर अत्यंत मार्मिक, सखोल व सोप्या भाषेत व्याख्यान दिले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्म बांधव आयु. बौद्ध उपासक गंगाराम नडगिरे व परिवार यांनी खीरदानाची सोय केली होती. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल विहाराच्या वतीने सागर कांबळे यांनी त्यांचा पुष्प देऊन सत्कार केला.
कार्यक्रम यशस्वी साठी मोठ्या संख्येने बौध्द उपासक उपासिका उवस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक त्रिरत्न सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आयु. अप्पा पालखे यांनी केले.

.jpg)